Email : rajeramrao@gmail.com
Phone : 02344 - 246251

About Department

Establishment: June 1969

 

ABOUT DEPARTMENT

       महाविद्यालयातील मराठी विभाग सन १९७१-७२ पासून विद्यादानाचे पवित्र कार्य अव्याहत करीत आहे. या विभागात कार्यतत्पर व व्यासंगी प्राध्यापकांची परंपरा आहे. श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विघमान कार्यध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळूंखे, डॉ. स.ग. यादव, प्रा. स.प. मिसाळ, प्राचार्य शामराव चव्हाण यांचा पत्नी प्रा. सौ . शशिकला चव्हाण, प्रा. गो.ल. गबाळे ,प्रा. माधव माळी यांच्यासारख्या व्यासंगी व विघार्थीप्रिय प्राध्यापकांची ही परंपरा आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शिक्षण विषयक ध्येयधोरणानुसार अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने या शाखेतील व विभागातील प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता कार्यकर्ता राहिला आहे.

 

  या प्रामाणिकपणाचे व निष्ठेचे फलित समाजामध्ये यशस्वीपणे जीवन जगणारे या विभागाचे सुसंस्कारी विघार्थी हेच आहे. यामध्ये आश्रमशाळा हुन्नर ता. मंगळवेढाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. एकनाथ होळकर, जि .प. प्राथमिक शाळा महाविद्यालय मिरज येथील मराठी विभाग प्रमुख कु. लक्ष्मी पवार, श्री. रामराव विद्यामंदिर जत येथील श्री. पांडुरंग साळूंखे आश्रमशाळा डिकसळ ता.सांगोला येथील श्री. आनंदा निळे, श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज पांचगणी येथील वामनराव सरगर तसेच  वनिता शिंदे, श्री. अप्पासाहेब कोकरे, बंडू गणपती काशीद व जयंत पवार मुंबई हायकोर्ट वकील, डॉ. संभाजी शिंदे पोलीस विभागातील सुप्रिया सकट, राहुल कांबळे,  चांगदेव खर्जे अशा कितीतरी जणांचा समावेश आहे.

 

आजही हा विभाग शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी रुजविलेल्या आदर्शांना प्रमाण मानून व ग्रामीण भागातील विधार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्यरत आहे.

 

महाविद्यालयांतर्गंत मराठी विभाग विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व गुणवत्ता वाढ यासाठी वर्षभर कार्यरत असतो. शौक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच बी. ए. भाग १ व बी. कॉम. भाग १ मध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सेतु अभ्यासक्रम (Bridge Course) उपक्रम राबविला जातो. त्यातून महाविद्यालयीन शिक्षणपद्धतीमध्ये प्रविष्ठ होणऱ्या विद्यार्थ्यांचे भाषिक ज्ञान आजमावले जाते. त्यासाठी त्यांची सदर अभ्यासक्रमावर चाचणी घेऊन प्रगत व अप्रगत विद्यार्थी  शोधले जातात व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी  वेगळ्या मार्गदर्शनाची सोय केली जाते.

शैक्षणिक वर्षामध्ये सर्व वर्गातील मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांच्या आकस्मिक चाचणी, घटक चाचणी, पुस्तक परीक्षण, भित्तीपत्रिका प्रकाशन, चर्चा सत्र व प्रकल्प लेखन अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या भाषिक ज्ञानात भर घातली जाते.  त्याच बरोबर दि. १ ते १५ जानेवारी या कालावधित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विद्यार्थ्यांच्या सक्रीय  सहभागाने साजरा केला जातो. या कालावधित काव्य वाचन, काव्यलेखन, निबंधलेखन, वक्तृत्व, कथालेखन, भित्तीपत्रिका, शब्दकोडे, सुंदर हस्ताक्षर, मराठी स्वाक्षरी, वाचनकट्टा या उपक्रमाबरोबरच महाराष्ट्राची लोकधारा ही ध्वनी चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविली जाते.तसेच दि.२७ फेब्रुवारी हा कवि कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्त एखद्या ज्येष्ठ विचारवंताचे व्याख्यान आयेजित केले जाते. दरवर्षी निसर्गरम्य ठिकाणी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात येते. की, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त लेखनाची प्रेरण मिळेल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना या पदवी प्राप्ती बरोबरच व्यवसायाभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम  देखील पूर्ण करता यावा या उद्देशाने या विभागामार्फत मुद्रित शोधन (proof reading) हा अभ्यासक्रम राबविला जातो. या शैक्षणिक वर्षामध्ये या अभ्यासक्रमासाठी १९ विद्यार्थी – विद्यार्र्थिंनी प्रवेशित होते. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांच्या कार्यालयांमध्ये व प्रकाशन संस्थांमध्ये मुद्रित शोधक म्हणून विद्यार्थ्याना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

या विभागातून पदवी प्राप्त करुन बाहेर पडणारा विध्यार्थी एक सुजाण व सुसंस्कृत नागरिक कसा घडविला जाईल यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते.